२४ तासात दुस-यांदा इसिसच्या तळांवर हवाई हल्ले

२४ तासात दुस-यांदा इसिसच्या तळांवर हवाई हल्ले

फ्रान्सने इसिस विरोधातील कारवाईची धार अधिक तीव्र केली असून, २४ तासात दुस-यांदा फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी इसिसचे सिरीयातील प्रमुख केंद्र बनलेल्या रक्का शहरावर बॉम्बफेक केली.

या हवाई हल्ल्यामध्ये इसिसचे कमांड सेंटर, प्रशिक्षण तळ उदध्वस्त केल्याचे फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. शुक्रवारी रात्री इसिसच्या अतिरेक्यांनी पॅरिसवर केलेल्या रक्तरंजित दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सने इसिस विरोधात जोरदार मोहिम उघडली आहे.

फ्रान्सच्या या कारवाईमध्ये १० राफेल आणि मिराज २००० विमाने सहभागी झाली होती. त्यांनी एकूण १६ बॉम्ब फेकले अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. हवाई हल्ल्यात इसिसचे दोन्ही तळ उदध्वस्त झाले.

फ्रान्सची सिरीयामध्ये इसिस विरोधातील हवाई हल्ल्यांची कारवाई सप्टेंबरपासून सुरु आहे. मात्र शुक्रवारी झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्सने मोठया प्रमाणात हवाई हल्ले सुरु केले आहेत.

रविवारी रात्रीही फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी रक्का शहरावर हवाई हल्ला करुन सिरीयाचे तळ उदध्वस्त केले होते. रक्का शहराला इसिसने सध्या आपली राजधानी बनवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *