जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर आज (मंगळवार) पहाटे पाकिस्तानी रेंजर्सकडून गोळीबार करण्यात आला.
बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांबा जिल्ह्यातील चलहारी आणि घुगवाल भागातील बीएसएफच्या नऊ चौक्यांवर आज पहाटे साडेतीन पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला बीएसएफ जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानच्या गोळीबारात एकही जवान जखमी झालेला नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीर मुद्द्यावरून पुन्हा एकदा बोलताना फुटीरतावाद्यांना पाठिंबा दिला होता. शरीफ यांच्या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाक सैन्याकडून सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे.