आरसा चमकल्याचा वाद पोचला पोलिसात

सातपूर परिरास बुधवारी सकाळी दुचाकी आरसा चमकत असल्याने उफाळून आलेला वाद थेट पोलिसात पोचला. पोलिसांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत त्यांचे समूपदेशन केले. दोन्ही बाजूचे लोक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने गुन्हे दाखल करण्याची दिलेली तंबी वादावर पडदा टाकण्यासाठी उपयोगी पडली.

तसेच कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात किरकोळ वादाने पोलिस हैराण झाले आहेत. श्रमिकनगरच्या हंसनगरी भागात बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीचा आरसा घरात चमकल्यावरून भगत नावाच्या व्यक्तीने आपल्या घरासमोरील कुटुंबाशी वाद घातला. अखेर दोघांनी थेट सातपूर पोलिस स्टेशनच गाठले. अगोदरही केवळ आंब्याच्या झाडाचे पान घराच्या बाजूने उडतात म्हणून भगत यांनी वाद घातला होता. आता दुचाकीचा आरसा चमकल्यावर वाद घालणे कितपत योग्य आहे असा सवाल तक्रारदार कुटुंबाने केला. दोन, तीन वेळा दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाल्याने पोलिसांनी अखेर तक्रारी दाखल केल्या. संबंधित दोनही कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. अनेक वर्षांपासून समोरासमोर राहणाऱ्यांमध्ये केवळ बाहेरील महिलांच्या शिरकावाने वादाला ठिणगी पडली असल्याचे समजते. पोलिसांनी दोघांनाही समज दिली असून यापुढे वाद झाल्यास कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील, अशी तंबीही दिली.

1 Comment

  1. त्या भगत च्या दोन कानाखाली वाजवायला पाहिजे होत्या पोलिसांनी, म्हणजे असल्या फालतू कारणावरून पोलिसांचा वेळ वाया घालवला नसता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *