पुणे जिल्ह्यात भररस्त्यात हत्याकांड! पिकअपने उडवलं, नंतर धारदार शस्त्रांनी घाव, दुहेरी खुनाचा बदला?

पुणे जिल्ह्यातीलदौंड तालुक्यातील पाटस परिसर पुन्हा एकदा हिंसक घटनेने हादरला आहे. 2021 मध्ये गाजलेल्या दुहेरी हत्याकांडातील एका आरोपीची शुक्रवारी रात्री पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभजवळ हत्या करण्यात आली. या घटनेमुळे जुन्या वैराची ठिणगी पुन्हा भडकली का, याचा तपास पोलीस करत आहेत. महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २९, रा. पाटस) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास भागवत हा आपल्या मित्रांसह दुचाकीवरून पाटसकडे जात होता. मुकदमवाडी उड्डाणपुलावर पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर ते खाली पडताच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी भागवतवर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंभीर जखमी झालेल्या भागवतचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *