राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने दोन ते १४ नोव्हेंबर या दोन आठवड्यांत केलेल्या तपासणी मोहिमेत नाशिक विभागात एकूण ७७ तपासण्या केल्या. यात सात आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत दोन गुन्ह्यांत तिघांना अटक झाली.
तसेच, शहरातील सिडको, नाशिक (दि. ४ नोव्हेंबर २०२६): येथे निवासी जागेत विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले. मात्र, या ठिकाणी कोणत्याही आस्थापनेचे नाव नमूद केलेले नाही. त्यांच्याकडून ४०,३९७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. कॉलेज रोडवरील व्ही. एस. न्यू फॅशन झोन येथे आयुर्वेदिक औषधाचे विनापरवाना उत्पादन सुरू होते. त्यांच्याकडून ५०,३४,९६० रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
राज्यभरात ६० उत्पादन व इतर आस्थापना आणि २५९ विक्री आस्थापना अशा एकूण ३१९ तपासण्या करण्यात आल्या. यात एकूण ११४ नियामक कारवाया झाल्या असून, १३७ नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच, २८ परवाने रद्द व ८६ परवाने निलंबित करण्यात आले.
… यांचे परवाने रद्द
इंडिया केमिकल्स लि. (वांबोरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), आदितेज फार्मास्युटिकल, (वडाळा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), आधार रक्तपेढी, (संगमनेर, जि. अहिल्यानगर), श्रीराम मेडिकल (भुसावळ), साई संकेत फार्मसी, मुळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, (कोपरगाव, जि. अहिल्यानगर, आयुष मेडिकल (ढोरजळगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), जय शंकर मेडिकल, (ढोरजळगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर
सेवा मेडिकल (लोहारा, ता. पाचोरा, जि. जळगाव), राजा मेडिकल (चाळीसगाव, जि. जळगाव), संजीवनी मेडिकल (अंधारी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), वसुंधरा मेडिकल (रावेर, जि. जळगाव), दवा इंडिया हेल्थ मार्ट लि., (जळगाव), गुरू मेडिकल (पाचोरा, जि. जळगाव), जनऔषधी मेडिकल, आनंद मेडिकल (पाचोरा, जि. जळगाव), धन्वंतरी मेडिकल (जळगाव), श्री गुरुदत्त मेडिकल (करजुले, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), राज मेडिकल (चास नळी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर, साई तनिष्का मेडिकल (शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
आस्थापना प्रकार–तपासण्या–नोटिसा–परवाने रद्द–परवाने निलंबन–एकूण नियामक कारवाई
उत्पादन आस्थापने—– १६— ९— ३—०— ३
विक्री आस्थापने—– ६१— २४— ४— १२— १६
एकूण—– ७७— ३३— ७— १२— १९
