पुण्यातील पत्नीने माहेरच्या लोकांच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; आता कोर्टाचा दणका, महिलेसह आई-वडील अन् दोन भावांनाही जन्मठेप

पत्नी नांदण्यास येत नसल्याच्या रागातून शिवीगाळ करणाऱ्या जावयाच्या घरावर कुऱ्हाड, बरशी, लोखंडी गज, काठ्यांनी हल्ला करून त्याचा निर्घृण खून करून कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी पत्नी, तिचे आई-वडील आणि दोघा भावांना पुणे न्यायालयाने जन्मठेप आणि साडेआठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. घटनेच्या सात वर्षांनंतर अनेक साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली असून, त्यामध्ये विसंगती असल्याचा बचाव पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळला. जानेवारी २०१९मध्ये ही घटना घडली होती.

‘सर्व साक्षीदार ग्रामीण डोंगराळ भागात राहात असून, शेतमजुरीचे काम करतात. त्यांना न्यायालयातील कामकाजाच्या पद्धतीची माहिती नाही. त्यांना अनेक महिने वारंवार न्यायालयात बोलावले गेले; परंतु त्यांची साक्ष नोंदवली गेली नाही. मुंबईहून पुण्यात येऊनही, आपली उलटतपासणी होईल या आशेने त्यांना न्यायालयाच्या बाहेर तासन्तास वाट पाहावी लागली. मात्र, अनेक महिने उलटूनही त्यांची उलटतपासणी झाली नाही. अशा परिस्थितीत, त्यांच्या साक्षीत काही विसंगती असणे स्वाभाविक आहे,’ असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी निकालात नोंदविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *