यंत्रमानवाने केला १३४ किमी चालण्याचा विक्रम

यंत्रमानवाने केला १३४ किमी चालण्याचा विक्रम

चिनी संशोधक ली क्यूईगडू याने बनवलेल्या यंत्रमानवाने ५४ तासात १३४ कि.मी चालण्याचा विक्रम करून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले. या यंत्रमानवाने अमेरिकेन यंत्रमानवाचा विक्रम मोडीत काढला आहे. या चार पायाच्या यंत्रमानवाने हा जागतिक विक्रम केला आहे.

गिनीज बुकात नोंद करणारा हा यंत्रमानव चॉग्किंग विद्यापीठाच्या टेलिकम्युनिकेशन (दूरसंचार)आणि अॅटोमेशन विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक लि क्यूईगडू यांनी तयार केला आहे. यंत्रमानव १३४.०३ कि. मी अंतर चालल्यानंतर त्याला ‘वॉकर -१’ असे नाव देण्यात आले.

गिनीज बुक निर्देशक सिद्धांतानुसार यंत्रमानवाने न थांबता अंतर पार करायला पाहिजे होते. ‘वॉकर- १’ या यंत्रमानवाने न थांबता १३४ कि.मी चा पल्ला एकदाच पुरेशी वीज वापरून पार केला आहे.

‘वॉकर -१’ या यंत्रमानवाने ५४ तास ३४ मिनीटे न थांबता १३४ कि. मी अंतर पार केले. नोव्हेंबर २०११ मध्ये न्यूयॉर्क येथील ‘रेंजर यंत्रमानवाने’ ६५.१८ कि.मी चे अंतर पार करून गिनीज बुकात नोंद केली होती.

नोव्हेंबर २०१४ मध्ये सुरू केलेल्या संशोधनामागे संशोधक क्यूईगडू यांनी विद्युत ऊर्जा आणि कार्यक्षमता ,रोबोटची चालण्याची क्षमता वाढवण्यासाठी, त्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी हा प्रयोग केला होता असे सांगितले. ‘

‘वॉकर- १’ च्या विकासकाला गिनिज रेकॉर्डच्या प्रतिनिधीकडून १ नोव्हेंबर रोजी गिनिज बुकचे प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *