पेट्रोलच्या मूळ किमतीपेक्षा कर अधिक

पेट्रोलच्या मूळ किमतीपेक्षा कर अधिक

आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे भाव घटलेले असतानाच भारतात मात्र त्याच्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत. कारण भारतात पेट्रोलवर प्रचंड कर लादले जात आहेत. आता तर पेट्रोलच्या मूळ उत्पादन किंमतींपेक्षा करच अधिक झाल्याचे दिसून आले आहे. परिणामी महागाई कमी होण्यातील हाच प्रमुख अडथळा असल्याचे समोर आले आहे.

पेट्रोलची उत्पादन किंमत ऑक्टोबरमध्ये प्रति लिटर २४.७५ रुपये होती, मात्र ग्राहकांना त्यासाठी ६०.७० रुपये मोजावे लागतात. २४.७५ रुपयांमध्ये कंपनीचा नफा पकडून पेट्रोलचा दर २७.२४ रुपये होतो. त्यात केंद्राचा अबकारी कर १९.०६ रुपये, डिलरचे कमिशन २.२६ रुपये, सेवा कर १२.१४ रुपये असे मिळून ६०.७० रुपये होतात. तर डिझेल ४५.९३ रुपयांना मिळत होते. त्याची उत्पादन किंमत २४.८६ रुपये होती.

नफा पकडून कंपन्या त्याचा दर प्रतिलिटर २७.०५ रुपये होतो. त्यानंतर अबकारी कर १०.६६ रुपये, डिलरचे कमिशन १.४३ रुपये, व्हॅट ६.७९ रुपये पकडल्यानंतर डिझेलचा दर ४५.९३ रुपयांवर पोहचतो.

यंदा ७ नोव्हेंबरपासून सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात लिटरमागे १.६० रुपये तर डिझेलमागे ४० पैसे वाढ केली. तेल कंपन्यांनी ग्राहकांना त्याची झळ लागू दिली नाही. अबकारी कर वाढल्याने सरकारला अतिरिक्त ३२०० कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. २०१४-१५ या वर्षात सरकारने पेट्रोलियम क्षेत्रातून ९९१८४ रुपये महसूल कमवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *