चक्रीवादळ अक्वान आंध्र प्रदेशात धडकण्याची शक्यता; महाराष्ट्रात कुठे आणि कधी पडणार पाऊस?

एका महिन्यात तिसरं चक्रीवादळ

अक्वान चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट कोणताही परिणाम होणार नाही. मात्र हवामानात थोड्या प्रमाणात बदल होईल. थंडी पाऊस आणि ऊन अशी विचित्र स्थिती पाहायला मिळणार आहे. चक्रीवादळ आल्यानंतर थंडी कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून दुष्काळाची भीषणता आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका महिन्यात तिसरं चक्रीवादळ आलं आहे.

यंदा भीषण उकाडा?

दुसरीकडे एल निनोचं संकट पुढे ढकललं गेल्यामुळे आता काही प्रमाणात थंड वारे वाहू लागले आहेत. एल निनोचा प्रभाव याआधी फेब्रुवारीपर्यंत राहणार होता. तो आता मार्च एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा भीषण उकाडा जाणवू शकतो, याशिवाय मान्सूनच्या वाऱ्यांवरही याचा काय परिणाम होणार ते पाहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *