मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमधील लिफ्ट दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बारा वर्षांखालील मुलांना पालकांच्या सोबतीशिवाय एकट्याने लिफ्ट किंवा एस्केलेटर वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात १ नोव्हेंबर २०२६ पासून महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मुव्हिंग वॉक, २०२६ या नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य ऊर्जा विभागाने अलीकडेच याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यात गृहनिर्माण संस्था (सोसायट्या) आणि व्यावसायिक संकुलांमधील लिफ्टच्या देखभालीची जबाबदारी अधिक कठोर करण्यात आली आहे.
