चक्रीवादळ अक्वान आंध्र प्रदेशात धडकण्याची शक्यता; महाराष्ट्रात कुठे आणि कधी पडणार पाऊस?

महाराष्ट्रात सध्या बऱ्याचठिकाणी थंडीचा तडाखा वाढला असून, तर कुठे दिवसा उन्हाचे चटके जाणवत आहेत. अशातच बंगालच्या उपसागरात शक्तिशाली अक्वान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, 20 नोव्हेंबरच्या रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ते धडकण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसून राज्यातील हवामानावर त्याचा प्रभाव काही प्रमाणात जाणवू शकतो. पश्चिम बंगालच्या समुद्रातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. सात ते आठ दिवस चक्रीवादळ तयार झालं आहे. अर्णब आणि मुरासूपेक्षा अधिक धोकादायक हे चक्रीवादळ असणार आहे. १२० किमी ताशी वेगानं हे लॅण्डफॉल होईल असा प्राथमिक अंदाज आहे. आंध्र प्रदेशकडे २० नोव्हेंबरच्या रात्री लॅण्डफॉल होण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

उत्तरेकडे थंड वारे वाढले आहेत. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटे गारठा आता वाढला आहे. घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी पडली आहे. तर कोकणात तापमानाचा पारा खाली उतरला आहे. मात्र, दिवसा उष्णता जास्तच वाढत आहे. चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १९ ते २२ नोव्हेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *