साहेब, हक्काच्या पेन्शनसाठी आणखी किती छळाल? वृद्ध महिलेचा टाहो; EPFविरोधात उपोषणाचा इशारा

पतीच्या निधनानंतर उरलेल्या आयुष्याचा आधार बनेल, या आशेने पेन्शनसाठी धडपडणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेस भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कार्यालयाच्या गलथान पद्धतीचा आणि मनमानी वसुलीचा तीव्र फटका बसला आहे. प्रशासकीय चुकीमुळे आधीच मानसिक धक्क्यात असलेल्या सुलभा दत्तात्रय भुरे यांना चुकीच्या पद्धतीने ६४ हजार रुपयांची दुहेरी वसुली सहन करावी लागली आहे. न्याय न मिळाल्यास या महिन्यापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सुलभा यांच्या पतीचे नाव दत्तात्रय भुरे होते. त्यांचे पती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधून (एचएएल) १९९८ मध्ये सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून त्यांना ‘ईपीएफ’ची पेन्शन सुरू होती. २५ मार्च २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर नियमानुसार सुलभा यांनी एप्रिल २०२४ मध्येच नाशिक येथील ईपीएफ कार्यालयाला पतीच्या मृत्यूची माहिती दिली. तसेच मृत्यूचा दाखला आणि मूळ पीपीओ (PPO) ऑर्डरही कार्यालयात जमा केली. त्या वेळी कार्यालयाने त्यांना पेन्शनसाठी नवीन बँक खाते उघडण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी नवीन खातेही उघडले. मात्र, त्यानंतर कार्यालयातून निरोप आला की, त्यांच्या पतीला ६४ हजार रुपये अधिक दिले गेले आहेत. त्यामुळे ही रक्कम आधी ईपीएफ कार्यालयात जमा करा, तरच पेन्शन सुरू होईल, असे त्यांना सांगण्यात आले. दुःखातून सावरत असलेल्या सुलभा यांनी नातेवाईक आणि परिचितांकडून कसेबसे पैसे उभे करून ते डीडीद्वारे थेट पीएफ कार्यालयात भरले. पैसे भरल्यामुळे आता आपली पेन्शन सुरळीत सुरू होईल, अशी त्यांची आशा होती. मात्र, ती फोल ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *