BMC कंत्राटी कर्मचाऱ्याने बसवलेल्या CCTV मध्ये त्याचाच मृत्यू झाला कैद, भालेकर कुटुंबाचा आधार हरपला, मध्यरात्री कारची धडक

मुंबई महापालिकेतील ३६ वर्षीय कंत्राटी कामगार विक्रम शांताराम भालेकर याचा १० ऑक्टोबर रोजी घाटकोपर पूर्व येथे कारच्या धडकेत मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जो सीसीटीव्ही कॅमेरा विक्रमनेच त्या रस्त्यावर लावला होता, त्यातच अपघाताचे क्षणही कैद झाले आहेत. परंतु अपघाताला कारणीभूत असलेले वाहन किंवा चालक याची ओळख अद्याप पोलिसांना पटवता आलेली नाही. नाईट शिफ्टला असलेला विक्रम ब्रेकवर असताना, एका भरधाव चारचाकी वाहनाने त्याला धडक दिली, त्याला १० ते १५ फूट फरफटत नेले. त्यानंतर चालक घटनास्थळावरुन पळून गेला.

हा अपघात ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील सर्व्हिस रोडवर, अदानी टॉवरजवळ घडला. ‘ बीएमसीच्या स्वच्छता वाहनांवरील बॅटरी आणि इतर उपकरणांची देखभाल करणारा विक्रम भालेकर एका डिव्हायडरवर बसला असताना त्याला या वाहनाने धडक दिली. धडक झाली तेव्हा तो मुख्य रस्त्यापासून दूर होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *