दिवेआगर दुर्घटनेनंतर रायगड समुद्र किनाऱ्यांवर पोलिसांची गस्त; रिमोट ऑपरेटेड उपकरणांचे ग्रामपंचायतींना वाटप

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले आहेत. गर्दीच्या किनाऱ्यांवर पोलिस आणि होमगार्डची गस्त वाढविणे, धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावणे, आपदा मित्रांना प्रशिक्षण देणे आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सुरक्षेचा विषय

दिवेआगर येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा आणि व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी गोगावले यांनी पर्यटक सुरक्षेचा विषय अधिक गांभीर्याने हाताळण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *