साहित्य :
दोन मोठय़ा वाटय़ा तांबडय़ा भोपळय़ाचा कीस, आंब्याचा सीझन असेल तर एक हापूसचा आंबा किंवा ४ टे. स्पून मँगो जॅम, ३ वाटय़ा साखर, ७-८ वेलदोडय़ाची पूड, थोडी जायफळ पूड, १०० ग्रॅम खवा, थोडे तूप, थोडी पिठीसाखर.
कृती :
तांबडय़ा भोपळय़ाचा कीस मोदकपात्रात चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावा. खवा थोडय़ा तुपावर भाजून घ्यावा व बाजूला ठेवावा. शिजलेला भोपळय़ाचा कीस, आंब्याचा रस किंवा मँगो व साखर एकत्र करून शिजवावे. मिश्रण घट्ट व्हायला लागले की त्यात भाजलेला खवा, वेलची व जायफळ पूड घालून ढवळावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की विस्तवावरून खाली उतरावे, जरा घोटावे. थोडी पिठीसाखर घालून घोटावे व तूप लावलेल्या थाळीत थापावे. गार झाल्यावर वडय़ा कापाव्यात. प्रत्येक वडीच्या मध्यभागी एक चारोळी लावून शोभिवंत करावे.