४ वाटय़ा कणीक, १ वाटी सुके खोबरे किसून बारीक करून, ३ वाटय़ा चिरलेला गूळ, पाव टी स्पून जायफळाची पूड, २ चमचे खसखस भाजून केलेली पूड, अडीच वाटी साजूक तूप.
कृती : प्रथम खोबऱ्याची बारीक केलेली पूड नुसतीच थोडी भाजावी. नंतर तुपावर कणीक मंद आचेवर खमंग भाजावी. खाली उतरवून त्यात भाजलेले खोबरे, खसखस, जायफळ पूड, गूळ घालून हाताने एकसारखे करून लाडू वळावेत. कोरडे वाटल्यास आणखी तूप घालावे. पटकन होण्यासारखे व पौष्टिक आहेत