कलिंगडचा हलवा

कलिंगडचा हलवा

साहित्य :

अर्धी वाटी कलिंगडाचा पांढरा कीस, एक वाटी साखर, पाव वाटी दुधाची पावडर,
थोडे तूप.
कृती :

कलिंगडाचा तांबडा भाग काढून घ्यावा.

पांढरा भाग किसून घ्यावा.

घट्ट पिळून पाणी काढावे व तो कीस कढईत तुपावर मंद गॅसवर परतावा.

नंतर थोडी दुधाची पावडर व साखर घालून हलवावे. साखरेचा पाक होतो.

मिश्रण कोरडे व्हायला लागले, की गॅस बंद करावा व आवडीप्रमाणे त्यात ड्रायफ्रूट वगैरे घालावे.

चवीला हा हलवा चांगला लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *