लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीने अल्पवयीन असलेला प्रियकर १७ वर्षीय मुलाला एका कॅफेमध्ये नेऊन मुका (किस) घेतला. मात्र, ही बाब अल्पवयीन मुलाच्या वडिलांना कळताच त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबंध ठेवण्याच्या हेतूने तरुणी आपल्या मुलाचा मुका घेतला, असा आरोप केल्याने २१ वर्षीय तरुणी गोत्यात आली आहे.
‘माझा मुलगा अल्पवयीन असूनही शारीरिक संबंध ठेवण्याच्या हेतूने तरुणीने मुलाला किस केला,’ अशी तक्रार वडिलांनी केली. त्यानुसार, पोलिसांनी तरुणीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या अंतर्गत ( पॉक्सो ) गुन्हा दाखल केला आहे.
वडिलांची तक्रार, युवतीवर पॉक्सोचा गुन्हा
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात तीन सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या ४७ वर्षीय वडिलांनी पाच सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ-नऊ महिन्यांपूर्वीची ओळख
पीडित अल्पवयीन मुलगा आणि आरोपी तरुणी हे एकमेकांचे लांबचे नातेवाइक आहेत. त्यांची आठ ते नऊ महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
कॅफेत नेऊन अल्पवयीन मुलाला किस
तीन सप्टेंबर रोजी तरुणीने अल्पवयीन मुलाला तळेगाव दाभाडेमधील एका केक कॅफेमध्ये नेले. तेथे त्याला किस केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणीने थेट मुलाच्या घरी जाऊन लग्नाचा तगादा लावला. ही बाब मुलाच्या वडिलांना समजताच त्यांनी तरुणीविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पिंपळवंडी प्रकरणी अवघ्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून, तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी साहिल खैरे याच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी ६३३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल केले. त्यामध्ये घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवाल, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींसह साक्षीदारांचे जबाब अशा भक्कम पुराव्यांचा समावेश आहे. या संवेदनशील घटनेचा पंधरा दिवसांत तपास करून, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले.
पेरुच्या आमिषाने उसाच्या शेतात नेऊन अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल खैरे (वय २५, रा. पिंपळवंडी) याने पीडित मुलीला पेरु देण्याचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेले होते. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, तिचा निर्घृण खून केला, असा आरोप त्याच्यावर आहे. ही घटना १८ ऑगस्ट रोजी घडली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्या विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Pune Fort Murder : कॉलेजचा मित्र, बिल्डरकडे जॉब; केतनच्या हत्येच्या कटाचे बारकावे रितेशला ठाऊक, लोहगड प्रकरणात नवी माहिती उघडपुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधीक्षक शुभमकुमार यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ निरीक्षक विश्वास जाधव यांनी तपास केला.
