कोकणवासीयांची अनेक दिवसांपासून सुरू असलेली रेल्वेगाडीची मागणी अखेर पूर्ण झाली. मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी ही नवी रेल्वेसेवा उद्घाटनानंतर मात्र पुन्हा धावलेली नाही.
पनवेलमध्ये राजकीय पक्षांकडून स्वागत
गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू झालेल्या या रेल्वेचे ठाणे आणि पनवेलमध्ये राजकीय पक्षांकडून स्वागत झाले. परंतु प्रवाशांना झालेला आनंद अवघ्या काही तांसांमध्ये विरला आहे. ही गाडी नेमकी कधी सुरू होणार? त्याचे आरक्षण कधी करता येणार याकडे कोकणवासींचे लक्ष लागले आहे.
