सांगलीमध्ये पुन्हा धक्कादायक घटना! कर्जाच्या तगाद्यामुळे टोकाचं पाऊल, पती-पत्नीचा एकामागून एक मृत्यू; पाटील कुटुंबावर शोककळा

सांगली जिल्ह्यातील पलूस येथील दाम्पत्याने विष प्राशन केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं या दाम्पत्याला मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. मनीषा संजय पाटील (वय 42) आणि संजय तात्यासो पाटील (वय 46) अशी मृतांची नावे आहेत. पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच कर्जाच्या तगाद्यामुळे त्यांनी विष प्राशन केल्याचं तालुक्यात चर्चा आहे. मात्र, या घटनेचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे

नेमकी घटना काय?

संजय पाटील आणि मनीषा पाटील यांनी 2 सप्टेंबर बुधवारी रोजी विष प्राशन केलं होतं. सुरुवातीला त्यांना ग्रामीण रुग्णालय, पलूस आणि त्यानंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानं डॉक्टरांनी 5 सप्टेंबर शनिवारी रोजी दुपारी दोघांना डिस्चार्ज दिला होता. मात्र, काल रविवारी सकाळी घरी असताना दोघांनाही पुन्हा त्रास सुरू झाला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी पलूस ग्रामीण रुग्णालय आणि तिथून पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *