MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाला आता पोलिसांनी मोठा धक्का बसला आहे. एस. एम. जोशी पूल, पत्रकार भवनाजवळ सुरू असलेल्या धरणे आंदोलनासाठी पोलिसांनी (Pune MPSC Student Protest) परवानगी नाकारली आहे. तसेच आंदोलनस्थळ तात्काळ रिकामे करण्याचे आदेश पुणे पोलिसांनी दिले आहेत. आंदोलकांनी पर्यायी ठिकाणी आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. विद्यार्थ्यांना तातडीने एसएम जोशी पूल परिसर रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांची आंदोलन करण्याची सुधारित परवानगी पुणे पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे आंदोलनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी मागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबरपासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वतीने नियोजित धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचं पत्रही देण्यात आलं होतं. त्यामुळे यापूर्वी आंदोलनासाठी देण्यात आलेली परवानगी रद्द झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं
