नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली

 संपूर्ण राज्यात दुष्काळाचे भीषण सावट घोंघावत असताना नागपूर जिल्ह्यालाही आता दुष्काळाची (Maharashtra Drought) झळ पोहचल्याचे भीषण वास्तव समोर आलं आहे. संपूर्ण नागपूर शहर तसेच नागपूर जिल्ह्यातील अनेक उद्योग आणि कारखान्यांना ज्या तोतलाडोह धरणातून (Totaladoh Dam) पाणीपुरवठा (Dam Water Level) होतो, त्या तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती झाली आहे. गेल्या वर्षी तोतलाडोह धरणात ऑक्टोबर महिन्याच्या दुसरा आठवड्याच्या शेवटी तब्बल 99.92 % पाणी साठा होता, मात्र या वर्षी फक्त 49.82% पाणी धरणात आहे.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर पेंच नदीवर असलेल्या तोतलाडोह धरण नागपूर शहराची पाण्याची तहान तर भागवतोच शिवाय औद्योगिक गरज आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी याच धरणातून पाणी दिला जातं. मात्र यंदा अल निनोच्या प्रभावामुळे नागपूर जिल्ह्यात 35% टक्के कमी पाऊस झाला आहे. तर पाटबंधारे (जलसंपदा) विभागाचे अधिकाऱ्यांच्या मते त्याचे विपरीत परिणाम या धरणातील जलसाठ्यावर ही दिसून येत आहे. साधारपणे मे महिन्याच्या अखेरीस जे दृश्य दिसायचे, ते यंदा ऑक्टोबर महिन्यातच दिसत आहे. दरवर्षी धरणातील पाण्याच्या मध्ये असलेल्या वाळूच्या छोट्या टेकड्या एप्रिल किंवा मे महिन्यात पाणी कमी झाल्यावर दिसायच्या. यंदा मात्र त्या टेकड्यांनी ऑक्टोबर महिन्यातच डोके वर काढले आहे.

नागपूर शहराला 2 दिवस पुरेल एवढा पाण्याचे दर 7 ते 8 दिवसात बाष्पीभवन

महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबर हिटच्या तीव्रतेमुळे नागपूर शहराला 2 दिवस पुरेल एवढा पाण्याचे बाष्पीभवन दर 7 ते 8 दिवसात होत असल्याने जलसाठा तीव्रतेने कमी होत आहे. त्यामुळे नागपूरकरांना पाण्याचा वापर आता खूपच काळजीपूर्वक करावं लागणार असून उधळपट्टी टाळावी लागणारच आहे. याचबरोबर प्रशासनानेही उरलेल्या 49% पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. पेंचच्याच्या घनदाट जंगलात असलेल्या तोतलाडोह धरणात जलसाठ्याची आणि पाणीपुरवठ्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या टीम थेट ग्राउंड झिरोवर पोहचली असता दुष्काळाची भीषण दाहकता समोर आली आहे.

Yavatmal News : मोठ्या, मध्यम आणी लघु प्रकल्पात 76 टक्के जलसाठा, 16 ऑक्टोबरपासून 10 टक्के कपातीचा निर्णय

अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाच्या मोठा खंड पडला. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पात 76 टक्के जलसाठा आहे. अशा स्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी 16 ऑक्टोबरपासून 10 टक्के कपातीचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीकडून घेण्यात आला.  कापूस , तूर आणि चारा पिकासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी बघता बेंबळा आणि अरुणावती या मोठ्या प्रकल्पातून आठ दिवसात तर मध्यम प्रकल्पातून दोन दिवसात तर लघु प्रकल्पातून तत्काळ आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याचा निर्णय पाणी आरक्षण समितीच्या वतीने घेण्यात आला

जिल्ह्यात मोठे 3 प्रकल्प असून, त्यात आजरोजी 67 टक्के जलसाठा आहे. 7 मध्यम प्रकल्पात ८२ तर 63 लघु प्रकल्पांत 84 टक्के पाणी आहे. दीड महिन्यांपासून पावसाची दडी आणि वाढते तापमान यामुळे बाष्पीभवन होऊन जलसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. अशास्थितीत पाटबंधारे विभागाने शासन आदेशानुसार पाणी आरक्षणाचे नियोजन सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *