किल्ले रायगडाच्या टकमक टोकावरून तरुण 800 फूट खाली कोसळला आहे. 800 फूट खोल दरीत या तरुणाचा मृतदेह सापडला. या तरुणाच्या मृत्यूमागे धक्कादायक कारण समोर आले. या तरुणाने पत्नीला फोटो पाठवून शेवटचा कॉल केला होता.
सुयोग पांचाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. सुयोग हा 37 वर्षांचा असून तो मूळचा खेडचा रहिवासी होता. शनिवारी रायगडावर आल्यानंतर त्याने पत्नीला टकमक टोकावरील फोटो पाठवून शेवटचा फोन केला. त्यानंतर तो बेपत्ता झाला. पोलिस आणि एसव्हीआरआरएस रेस्क्यू पथकाने शोधमोहीम सुरू केली. ड्रोनच्या सहाय्याने टकमक टोकाच्या खाली निजामपूर बाजूच्या सुमारे 800 फूट खोल दरीत त्याचा मृतदेह आढळून आला.
रेस्क्यू पथक आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, महाड तालुका पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. किल्ले रायगडाच्या टकमक टोकावरून उडी मारून सुयोग याने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सुयोग याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.
टीव्हीच्या वादातून बापानेच केली 17 वर्षीय मुलीची बॅटने मारून हत्या
सातारा शहरात एका शिक्षक दांपत्याच्या 17 वर्षीय मुलीने डोके आपटून आत्महत्या केल्याचा बनाव सातारा पोलिसांनी काही तासांतच उघडकीस आणला आहे. 112 क्रमांकावर आलेल्या कॉलनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयास्पद परिस्थितीचा कसून तपास केला.तपासात रात्री टीव्हीच्या आवाजावरून वाद झाला असल्याचे समोर आले यामध्ये संबंधित मयत मुलीने लहान बहिणीच्या डोळ्यावर मारहाण केल्याचे समोर आले. या वादातून संतापाच्या भरात वडील पुरुषोत्तम कदम यांनी मुलीच्या डोक्यात बॅटने जोरदार प्रहार केले. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.या घटनेनंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी दिली.
