अभिजीत दिपके यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, थेट विमानात घुसून कारवाई, नेमकं काय घडलं?

दिल्लीमध्ये आंदोलनासाठी निघालेल्या अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अभिजीत दिपके विमानाने मुंबईहून दिल्लीला पोहोचले असता कारवाई करण्यात आलं. विशेष म्हणजे पोलिसांनी त्यांना विमानातूच ताब्यात घेतलं. याचा व्हिडीओ समोर आला असून, पोलीस विमानात दिसत आहेत. अभिजीत दिपके यांना विमानातून खाली उतरुनही दिलं नाही. यावेळी अभिजीत दिपके ही हिटलरशाही असून, पोलीस मला अटक करण्यासाठी आले आहेत असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. यादरम्यान अभिजीत दिपके त्यांच्याकडे मला माझी बॅग तर घेऊ द्या अशी हात जोडून विनंती करत असल्याचंही दिसत आहे. तसंच मी अटक होण्यासाठीच आलो आहे असंही सांगत आहेत.

अभिजीत दिपके सकाळी 8 च्या सुमारास मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास ते दिल्ली विमानतळावर पोहोचले. पण टर्मिनलबाहेर पडण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीस आम्हाला थेट विमानातून अटक करण्यासाठी आले आहेत. इंदिरा गांधी यांनीही असं काही केलं नव्हतं. ही हिटलरशाही आहे, जिथे दिल्ली पोलीस विमानात आले आहेत आणि अटकेची कारवाई करत आहेत. आम्ही अटक होण्यासाठीच आलो आहोत, आम्ही तुम्हाला घाबरत नाही”. यावेळी त्यांनी भारत माता की जय आणि इन्कलाब जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *