शाळेतून घरी जाताना ट्रेलरची धडक, पुण्यात बाबांच्या डोळ्यादेखत लेकीचा जागीच अंत, पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं

शाळेतून मुलींना घरी घेऊन निघालेल्या वडिलांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरची धडक बसून दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय प्रतिभा नाईक हिचा मृत्यू झाला. तिची मोठी बहीण वैष्णवी (वय १७) हिच्या दोन्ही पायांवरून कंटेनरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. मंगळवारी (आठ सप्टेंबर) दुपारी कात्रज-कोंढवा रस्त्यावर राजस सोसायटी चौकाजवळील कपिला दूध डेअरीसमोर हा अपघात घडला. कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यूटर्न घेताला ट्रेलरची दुचाकीला धडक

प्रतिभा आणि वैष्णवी कात्रज- कोंढवा रस्त्यावरील खासगी शाळेत शिकत होत्या. देविदास नाईक त्यांच्या दोन मुलींना शाळेतून घेऊन दुचाकीवरून गुजर- निंबाळकरवाडीच्या दिशेने घरी निघाले होते. कोंढव्याकडून खोपडेनगरच्या दिशेने जात असताना कपिला दूध डेअरीजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्याने त्यांना यू-टर्न घ्यावा लागला. त्याच वेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रेलरची दुचाकीला धडक बसून, दुचाकी कंटेनरखाली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *