दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 11 वी पासून पदवीपर्यंत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी एसटी पास मोफत करण्यात आलाय.
या योजनेला स्वाती अभय योजना असं नाव देण्यात आलंय. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत घोषणा केलीय. लातूरच्या स्वाती पिटले या विद्यार्थिनीनं पासला पैसे नसल्यामुळं आत्महत्या केल्यानंतर सरकारला याबाबत जाग आली.
या योजना नोव्हेंबर 2015 ते मार्च 2016 पर्यंत राबवण्यात येणार आहे. यासाठी एसटीवर 9 कोटी 18 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे 4 लाख 60 विद्यार्थ्यी उच्च शिक्षण घेतात.