पतीच्या निधनानंतर मालमत्तेच्या वादातून सासरच्या आणि मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून एका ३८ वर्षीय पुष्पा शिरोळे यांनी आत्महत्या केली आहे, कामोठे पोलिसांनी या प्रकरणी सासू, नणंद आणि दोन दिरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय घडलं?
पुष्पा यांचा विवाह २०१४मध्ये सतीश शिरोळे यांच्याशी झाला होता. सतीश यांचे जून, २०२३मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर पुष्पा या दोन लहान मुलांसह कामोठे येथे राहत होत्या. पतीच्या निधनानंतर मिळणारे लाभ, विम्याचे पैसे आणि कामोठे येथील हक्कावरून घराच्या मालकी सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. सासू कोंडाबाई, नणंद प्रतिभा, दीर संदीप आणि विनायक हे वारंवार पैशांची मागणी करीत होते. या त्रासाबाबत त्यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये कामोठे पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी पुष्पा यांनी आपल्या लहान मुलीला, ‘मी आता कधीच घरी येणार नाही’, असे सांगून घर सोडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह कुलाबा परिसरातील समुद्रात सापडला.
