पत्नी व मुलाचा खून करुन पतीची आत्महत्या

पाषाण येथे मंगळवारी सकाळी राजू गायकवाड (४०) याने कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाचा खून करून स्वत:ही गळफास घेतला.

गवंडी असलेला राजू पत्नी आरती (३७) व दोन मुलांसह पाषाण-निम्हण मळा येथील वीटभट्टीवर राहत होता. सध्या बांधकामे बंद असल्याने त्याच्याकडे काम नव्हते. त्यात त्याला ताडी पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे पती-पत्नीत नेहमी खटके उडत असत.

अशाच वादातून मंगळवारी सकाळी राजूने पत्नी आरती व मुलगा विशाल (१९) हे दोघे झोपलेले असताना त्यांच्यावर कु-हाडीने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली.

मात्र, मुलगी शुभांगी पाहुण्यांकडे झोपायला गेल्याने वाचली. या घटनेमुळे शुभांगीला मानसिक धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *