नोव्हेंबरमध्ये ‘मॅगी’ भारतात येणार

नोव्हेंबरमध्ये ‘मॅगी’ भारतात येणार

नेस्लेने भारतात ‘मॅगी’चे उत्पादन सुरू केले असून तपासणीनंतर ती बाजारात उपलब्ध होणार आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत मॅगी बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता नेस्लेच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे.

भारतातील नाजनगड (कर्नाटक), मोगा (पंजाब) आणि बायचोलिम (गोवा) येथे मॅगीचे उत्पादन सुरू करण्यात आल्याची माहितीही या वेळी प्रवक्त्याने दिली.

मॅगीमध्ये शिशाचे अधिक प्रमाण आढळल्याने भारतात मॅगीवर बंदी आणण्यात आली होती. त्यानंतर नव्याने उत्पादन करण्यात आलेल्या मॅगीचे नमुने तीन प्रयोगशाळांमध्ये तपासण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.

त्यानुसार लवकरच हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात येणार असून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मॅगी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, ही सर्व प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असेही प्रवक्त्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *