देशावर एल निनोचं संकट ओढवलं असतानाच मुंबईतील पाणीसाठ्यामुळे नागरिकांचं टेन्शन वाढणार आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं असलं तरी भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीच्या 90 टक्केच पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसोमर 2027च्या उन्हाळ्यापर्यंत पुरेसं पिण्याचे पाणी साठवून ठेवण्याचं मोठं आवाहन निर्माण झालं आहे.
सात तलावांमध्ये किती पाणी शिल्लक?
मुंबई शहरात सात प्रमुख जलाशयांमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही जलाशयांमध्ये 144.7 हजार कोटी लीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान मान्सूनच्या हंगामात हे सातही तलावं तुडुंब भरतात. त्यानंतर या सात तलांमधून सुमारे 3,950 एमएलडी पिण्यायोग्य पाणी वर्षभर शहरातील रहिवाशांना पुरवले जाते. मुंबईत सध्या पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे संपूर्ण शहर या सात जलाशयांवर आणि मान्सूनवर अवलंबून राहतं.
मंगळवारी या सातही जलाशयांमधील पाणीपुरवठा त्यांच्या क्षमतेच्या 15 टक्क्यांवर म्हणजेच 2.21 लाखांवर पोहोचला. प्रत्येक टक्का पाणी शहराला तीन दिवसांपर्यंत पिण्यायोग्य पाणी पुरवू शकतं. त्यानुसार शहरासाठी सध्या केवळ 45 टक्के पाणीपुरवठा उपलब्ध आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी Indian Expressशी बोलताना दिली आहे.
एल निनोमुळे मान्सूनला विलंब
शहरात लवकरच मान्सूनचं आगमन तर होणार आहे. त्यामुळे हा पुरवठा पूर्ववत होईल अशी आशा असते पण एल निनोमुळे हे शक्य होईल की नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे. यंदा इतिहासातील सर्वात तीव्र एल निनो सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम यापूर्वीच दिसायला सुरूवात झाली आहे. जून 1 रोजी दाखल होणाऱ्याला मान्सूनला 4 दिवसांचा विलंब झाला आहे. त्यानंतरही पावसाची तीव्रता कमीच राहणार आहे.
जर शहरात पुरेसा पाऊस झाला नाही तर या जलाशयांमध्ये कमी पाणीसाठा निर्माण होणार नाही. सप्टेंबरनंतर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर हीटमुळे शहरात पुन्हा उन्हाच्या झळा बसतात. त्यावेळी तलावातील पाणीपुरवठा आणखी कमी होतो. यामुळे पुढील मान्सून येईपर्यंत शहराला पुरेसं पिण्यायोग्य पाणी पुरवणं कठीण होणार आहे.
बीएमसीने काय पावलं उचलली आहेत ?
यासाठी महापालिकेने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. तातडीचा उपाय म्हणून शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. 15 मेपासूनच शहरात 10 टक्के पाणीकपातही लागू करण्यात आली आहे. पाण्याच्या टँकर विक्रीचे दर वाढत नाहीत याकडेही पालिका लक्ष देऊन असणार आहे. त्याशिवाय नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईत मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला तर पाणीपुरवठा पूर्ववत होतं. इतर महिन्यांमधील अतिरिक्त पाणी तर असचं वाहून जातं. पण जर तसं झालं नाही तर शहरातील धरणं भरणंही कठीण होतं. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने पालिका परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. पण तोपर्यंत महापालिका गाफील राहणार नसून कोणत्याही परिस्थितीसाठी ते सज्ज असतील अशी माहितीही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
