आणखी एका खासदाराचा राजीनामा, आता TMC चे फक्त 10 खासदार राहिले; ममता बॅनर्जींना मोठा धक्का

 तृणमूल काँग्रेसपत्र काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, ममता बॅनर्जी यांना आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. गुरुवारी, पक्षाचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बारेक यांनी राजीनामा दिला. विशेष म्हणजे, एका आठवड्याच्या आत राज्यसभेतून राजीनामा देणारे हे तिसरे खासदार आहेत. केवळ एक दिवस आधी 10 जून रोजी, सुष्मिता देव यांनी राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला होता. आता TMC चे फक्त 10 खासदार राहिले आहेत.

टीएमसीचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बाराईक यांनी राज्यसभेतून राजीनामा दिला आहे. त्याच्याआधी सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला आहे. प्रकाश चिक बाराईक यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेतील पक्षाचे संख्याबळ 10 खासदारांपर्यंत कमी झाले.  पुढील आठवड्यात टीएमसीचे आणखी तीन राज्यसभा खासदार राजीनामा देऊ शकतात, ज्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाबाबात मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.

सर्वप्रथम TMC च्या आमदांरानी बंडखोरी केली. TMC च्या 80 पैकी 58 आमदारांनी अधिकृत विधिमंडळ पक्षातून बाहेर पडून पश्चिम बंगाल विधानसभेत मुख्य विरोधी गट म्हणून मान्यता मिळवली. या गटाचे नेतृत्व पक्षातून काढून टाकलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी केले होते. त्यानंतर या बंडखोर गटाने दावा केला आहे की, आणखी आमदार त्यांच्यात सामील झाले आहेत.

यानंतर काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखालील गटाने मोठी बंडखोरी केली.  काकोली घोष दस्तीदार यांच्यासह TMC च्या 20 खासदारांनी बंडखोरी केली.   तर, 10 जून रोजी जादवपूरच्या खासदार सयोनी घोष आणि कोलकाता दक्षिणच्या खासदार माला रॉय यादेखील बंडखोर गटात सामील झाल्या. घोष दस्तीदार आणि रॉय यांच्या व्यतिरिक्त, या गटात अबू ताहेर, असित माल, अरूप चक्रवर्ती, कालीपदा सोरेन, जगदीश बसुनिया, प्रसून बॅनर्जी, शर्मिला सरकार, शताब्दी रॉय, युसूफ पठाण, जून मालिया, खलीकुर रहमान, बापी हल्दर, रचना बॅनर्जी, मिताली बाग, देव अधिकारी आणि पार्थ भौमिक यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. शत्रुघ्न सिन्हा हे देखील बंडखोरांमध्ये सामील असल्याच्या बातम्या असल्या तरी, टीएमसी नेते सांगतात की हे अभिनेते-राजकारणी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देत आहेत.

प्रकाश चिक बाराईक कोण आहेत?

2024 मध्ये प्रकाश चिक बाराईक यांनी पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार (एसटी) मतदारसंघातून एआयटीसी उमेदवार लोकसभा निवडणूक लढवली. प्रकाश चिक बाराईक पदवीधर आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात चहाच्या मळ्यात कामगार आणि हंगामी पिकांचे पुनर्विक्रेता म्हणून केली. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रकाश चिक बाराईक यांची एकूण मालमत्ता 24.5 लाख असून दायित्व 0 आहे. प्रकाश चिक बाराईक यांनी 8.9 लाख वार्षिक उत्पन्न जाहीर केले आहे. त्यांच्यावर एक फौजदारी खटला प्रलंबित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *