मांजरीशी खेळणाऱ्या दीड वर्षांच्या चिमुकलीला 12 वर्षांच्या मुलीने सहाव्या मजल्यावरुन फेकलं, निमूट पुन्हा सायकल चालवू लागली, गोरेगावातील घटना सीसीटीव्हीत कैद

 गोरेगाव येथे दीड वर्षाच्या मुलीला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणारी १२ वर्षाची मुलगी दीड वर्षांच्या चिमुरडीला सहाव्या मजल्यावरील डक्टमध्ये ढकलताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत अल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत लहानगीचा जागीच मृत्यू झाला.

सहाव्या मजल्यावरुन खाली फेकलं

मयत दीड वर्षाची चिमुकली कुटुंबीयांसह गोरेगाव येथील शिवशाही प्रकल्पात वास्तव्यास होती. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ती आई-वडील आणि चार भावांसोबत राहत होती. एका नातेवाईकाने सांगितल्यानुसार, “बुधवारी रात्री ती घराबाहेर मांजरीसोबत खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणारी १२ वर्षांची मुलगी तिथे आली. तिने चिमुरडीला उचलून सहाव्या मजल्यावरुन खाली फेकले.”

भावाला चिमुकली प्रथम दिसली

चिमुकली बराच वेळ कुठे दिसत नसल्याने आईने एका भावाला तिला शोधायला पाठवले, पण ती कुठेही सापडली नाही. मुलीची आत्या म्हणाली “काही मिनिटे शोधल्यानंतर, तिच्या भावाने जिन्याच्या मोकळ्या जागेतून खाली पाहिले, तेव्हा त्याला जमिनीवर कोणीतरी पडलेले दिसले. तिचे कपडे त्याच्या बहिणीच्या कपड्यांसारखेच होते. त्यानंतर त्याने धावत जाऊन आईला ही गोष्ट सांगितली.”

चिमुरडीच्या भावाने तिला खाली पडलेल्या अवस्थेत पाहिले आणि तत्काळ कुटुंबीयांना ही माहिती दिली. कुटुंबीयांनी खाली धाव घेत तिला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सीसीटीव्हीत घटना उघड

घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपास करताना पोलिसांना ही गोष्ट संशयास्पद वाटली की, सहाव्या मजल्यावरील रेलिंग उंच असतानाही लहान मूल तिथून खाली कसे पडू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *