ठीक आहात का? परप्रांतीय कॅब चालकाच्या मारहाणीत दुखापत, ठाण्यातील वृद्धाला राज ठाकरेंचा फोन

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर परप्रांतीय ओला चालक निशांत धर शुक्ला याच्या मारहाणीत जखमी झालेले वृद्ध सरोज दस्तुर यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट राज ठाकरेंशी कॉलवरुन बातचित करुन दिली.काय झाला संवाद?

राज ठाकरे : कसे आहात तुम्ही ठीक आहात?
सरोज दस्तुर : मी ठीक आहे, पाय ठीक आहे, सर्जरी बाकी आहे, सूज कमी झाली की करता येईल, त्याचीच वाट पाहतोय
सरोज दस्तुर यांची पत्नी : आमचा फोकस सध्या त्यांच्या रिकव्हरीवर आहे. पण तुम्ही फोन करुन विचारपूस केलीत त्याबद्दल आभार
राज ठाकरे : काळजी घ्या आणि काही लागलं तर सांगा

 

काय आहे प्रकरण?

रस्त्यावर थुंकल्याबाबत जाब विचारल्याने परप्रांतीय ओला चालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात मंगळवारी घडली होती. या मारहाणीत सरोज दस्तुर यांच्या पायाला दुखापत झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर येताच शिवसेना व शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या चालकाला शोधून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तातडीने दखल घेऊन ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना या चालकावर कठोर कारवाईचे आदेश दिले. तर आरोपीला रात्री अटक करण्यात आली. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही सरोज दस्तुर यांची चौकशी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *