मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरु केलं आहे. ‘सातारा संस्थानचा जीआर काढा, गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या, नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी’, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या भेटीला गेले आहेत. या बैठकीत सरकारने जरांगे पाटलांना नवीन आश्वासने दिली आहेत.
सरकारची नवीन पाच आश्वासने
महिन्याभरात मराठा आरक्षण कक्ष सुरु करु
नोंदी, प्रमाणपत्र वाटप, जातपडताळीसाठी 8 दिवसांत हेल्पलाईन सुरु करु
कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी एसओपी तयार करु
आंदोलकांच्या वारसांना 15 दिवसांत अर्थसहाय्य करु
हयगय केलेल्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करु
