निवृत्तीनंतर पेन्शनचा प्रश्न सुटला, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू! कोट्यवधी लोकांना होणार मोठा फायदा

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफआरडीएने NPS संचय नावाची नवीन निवृत्तीवेतन योजना सुरू लाँच केली आहे. एनपीएस आणि अटल निवृत्तीवेतन योजनेनंतर पीएफआरडीएची ही तिसरी निवृत्तीवेतन योजना आहे. भारतात मोठ्या संख्येने लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, पण त्यांच्याकडे रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्नाचाठोस स्रोत नसतो.ही समस्या लक्षात घेऊन PFRDA ने एनपीएस संचय योजना सुरू केली.

कामगारांसाठी सरकारची नवीन पेन्शन योजना

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना पगारदार व्यक्तींप्रमाणेच सेवानिवृत्ती आणि पेन्शन लाभ मिळू शकेल. कामगारांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळायचं स्वप्न नसून आता एक वास्तव बनले आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण किंवा PFRDA ने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विशेष NPS संचय योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाखो कामगार समाविष्ट होतील आणि त्यांना पेन्शनचे लाभ मिळतील.

सरकारने लाँच केलेली ही नवीन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीची सोपी आणि सुलभ आवृत्ती मानली जात आहे. या नव्या पेन्शन योजनेचा उद्देश विशेषतः लहान व्यवसाय, रोजंदारी, घरगुती काम किंवा इतर अनौपचारिक नोकऱ्यांमध्ये गुंतलेल्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ देण्याचा आहे. PFRDA ने म्हटले आहे की या योजनेत गुंतवणुकीचे पर्याय आणि मालमत्ता वाटप सोपे केले आहे, जेणेकरून लोक आर्थिक सल्लागाराशिवायही सहजपणे गुंतवणूक करू शकतील.

एनपीएस संचय पेन्शनचा फायदा कोणाला?

या श्रेणीमध्ये रोजंदारीवर काम करणारे मजूर, छोटे दुकानदार, गिग वर्कर्स, घरगुती कामगार आणि प्लंबर व इलेक्ट्रिशियन यांसारख्या कामगारांचा समावेश आहे. सध्या या व्यक्तींना कोणतेही औपचारिक निवृत्तीवेतन लाभ मिळत नाहीत त्यामुळे, PFRDA ने या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी NPS संचय योजना सुरू केली. या योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा खूप कमी आणि सोपी आहे, जेणेकरून कमी उत्पन्न असलेले लोकही यात सामील होऊ शकतील.

एनपीएस संचय अकाउंट कुठं आणि कसं उघडायचे?

  • ई-एनपीएस पोर्टल किंवा केफिनटेकच्या माध्यमातून कोणीही घरबसल्या खाते उघडू शकते.
  • ऑफलाइन खाते उघडण्यासाठी कोणत्याही बँकेत, वित्तीय संस्था किंवा सेवा केंद्रात नोंदणी करा.
  • एनपीएस संचयसाठी सर्व किमान आणि भविष्यातील गुंतवणुकीचे नियम सध्याच्या एनपीएस योजनेप्रमाणेच आहेत.
  • खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली किमान गुंतवणूक 500 रुपये आणि त्यानंतर, दरवर्षी किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल.

एनपीएस संचय ‘ऑल सिटीजन मॉडेल’ आणि ‘मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क’ (MSF) अंतर्गत सुलभ योजना आहे. सोप्या भाषेत बोलायचे म्हणजे ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांना जास्त तांत्रिक सल्ल्याशिवाय वृद्धापकाळासाठी सुरक्षित गुंतवणूक करायची आहे. ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आणि संपूर्णपणे बाजाराशी निगडित असून दीर्घकाळात यातून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

लेखाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न (वारंवार विचारले जाणारे प्रश्न- FAQs)

प्रश्न 1 एनपीएस संचय योजना केव्हा अंमलात आली?
एनपीएस संचय योजना 6 मे, 2026 रोजी अंमलात आहे.

प्रश्न 2. एनपीएस संचयमध्ये कोण गुंतवणूक करू शकते?
18 ते 85 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो

प्रश्न 3. ही योजना फक्त असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी आहे का?
मुख्य लक्ष असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर आहे, पण पात्र भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

प्रश्न 4. एनपीएस संचयमध्ये केवायसी (KYC) आवश्यक आहे का?
होय, खाते उघडण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *