एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्सला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 24 तासानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी रमेश म्हात्रे यांच्यासोबत असणाऱ्या तिघांना अटक केली होती. मात्र नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली नव्हती. रमेश म्हात्रे यांचा शोध घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तर दुसरीकडे रमेश म्हात्रे यांनी माध्यमांसमोर येत दिलगिरी व्यक्त केली होती. यानंतर अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *