रायगडमधील पाताळगंगा नदीत एक-दोन नव्हे तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, ते घरी घेऊन जाऊ नका अन्यथा…

रायगडमध्ये अतिमुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. या पावसाचा फटका सर्वसामान्य बसला. पाताळगंगा नदीला पूर आल्यामुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला. नदीला पूर आल्यावर गाड्या, झाडं, जनावरं किंवा अगदी माणसदेखील वाहून गेलेल्याचा अनेक घटना आपण पाहिला आहेत. पण रायगडमधील पाताळगंगा नदीतील दृष्य अतिशय भयानक होतं. या नदीत एक – दोन नव्हे तब्बल 3000 गॅस सिलिंडर वाहून गेले.

जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केल्यामुळे याचा फटका एमआयडीसी आणि चावणे परिसरातील गोदामाना बसला आहे. या गोदामातून तब्बल 3 हजार गॅस सिलिंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.  पावसाचे पाणी बॉटलिंग प्लांटमध्ये शिरल्याने ही धक्कादायक घटना घडली.

धक्कादायक म्हणजे पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारे हे सिलेंडर पाहून स्थानिक नागरिकांनी नदी काठी एकच गर्दी केली. नदीतून ते काढण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली. अनेकांनी चक्क छोट्या होड्या नदीत घेऊन उतरुन  हे सिलेंडर काढल्याचेही समोर आलं आहे.

नदीत मोठ्या संख्येने सिलिंडर तरंगत असल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. या घटनेनंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी लोकांना आवाहन केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, लोकांनी नदीकाठावर किंवा नदीत तरंगताना आढळणारे कोणतेही सिलिंडर घरात घेऊ नयेत. त्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, पाण्यात तरंगणाऱ्या सिलिंडरमध्ये गॅस आहे की नाही किंवा ते सुरक्षित स्थितीत आहेत की नाही याची कोणतीही खात्री नाही. केवळ कुतूहलापोटी किंवा लोभापोटी ते उचलण्याचा किंवा उघडण्याचा प्रयत्न करणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे एवढा मोठा धोका घेऊन नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *