मे महिन्याला सुरूवात झाली असून महाराष्ट्रासह भारतात उष्णतेची तीव्र लाट पाहिला मिळत आहे. हवामान विभागानेही अनेक राज्यांना उष्णतेसाठी इशारा दिला आहे. दक्षता म्हणून काही राज्यांनी यापूर्वीच शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत. पण आता दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि राजस्थान यांसारख्या इतर राज्यांमध्ये सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
राजधानी दिल्लीत शाळांसाठी 11 मे ते 30 जून 2026 या दरम्यान उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असून आता शाळा 1 जुलैला सुरु होणार आहे.
उत्तर प्रदेशामधील शासकीय प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि सर्वसमावेशक शाळा 20 मे ते 15 जून पर्यंत बंद राहणार असून खाजगी संस्थांची उन्हाळी सु्ट्टीसंदर्भात वेगवेगळे वेळापत्रक आहे. तर बिहारमध्ये अजून शाळा सुरु असून त्यांना उन्हाळी सुट्टी 1 जून ते 20 जून पर्यंत असणार आहे.
