मुंबई हे शहर चोवीस तास जाग असतं. मुंबई ही गुन्हेगारीसाठी पण ओळखली जाते. दोन टोळीमधील वाद आणि त्यात पोलिसांची एन्ट्री हे चित्र अनेक वेळा मुंबईत पाहिला मिळतं. मुंबईतील अशीच एक थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईतील नावाजलेल्या सायन रुग्णालयात एक तरुण डोक्यात अक्षरश: कोयता खुपसलेल्या अवस्थेत स्वतः चालत आला. सायन रुग्णालयातील आयसीयूच्या बाहेर तो अगदी सहज उभा होता. धक्कादायक म्हणजे तो काहीच घडलं नाहीय असं मस्त उभा तर होताच शिवाय मोबाईलमध्ये काहीतरी टाइप करताना दिसत आहे. दुसरीकडे त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही काही फरक पडला नाही, असं काहीस चित्र या व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
हा व्हिडीओ नीट पाहिल्यावर असंही लक्षात येतं की, त्याच्यासोबत कोणीही दिसत नाही आहे. तर रुग्णालयातील डॉक्टरही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. जणू काही किरकोळ दुखापत झालेला एखादा रुग्ण तिथे उभा आहे.
मुंबईतील रुग्णालयात थरारक घटना!
मुंबईतील या थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओने सर्वांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमधील तरुणासोबत हाणामारी झाल्याच जाणवतं. कारण त्याचा शर्ट फाटलेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार हे भयानक दृश्य पाहून मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात आलेले इतर काही रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
रुग्णालयात त्यावेळी उपस्थितीत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, तो गंभीर जखमी अस्वस्थेत स्वत:च चालत आला. त्याची अस्वस्था पाहता त्याला तात्काळ उपचाराची गरज होती. पण रुग्णालय व्यवस्थेकडून त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कोण आहे तो तरुण आणि काय घडलं त्याच्यासोबत?
रुग्णालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाचं नाव रोहित पवार आहे. तो मानर्खुदचा राहणारा असून त्याचं वय 27 वर्षांचं आहे. तीन अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी त्या मुलांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना डोंगरी बालगृहात ठेवण्यात आलं आहे. या तरुणावर शुक्रवारी 2 मे 2026 रोजी रात्रीच्या वेळी हल्ला झाला. त्यानंतर 3 मे 2026 रोजी साधारण 3 ते 3.30 दरम्यान तो सायन रुग्णालयात आला. त्याच्या वडिलांनी सांगितलं की, तो घरातून शुक्रवारी 2 मे 2026 ला 10 च्या दरम्यान बाहेर पडला. त्याला मी जाऊ नको असं म्हटलं होतं तरी तो गेला. तीन अल्पवयीन मुलं त्याचे मित्र असून जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोलं जातंय. त्याची प्रकृती आता ठीक आहे. दरम्यान कोयत्या हा त्या तरुणाच्या डोक्यात जवळपास 1.5 इंच आत खोलवर शिरला होता. नशिबाने मेंदूला कुठलीही इजा न झाल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
