महाराष्ट्रासह यंदा मुंबईतही उकाड्याने नागरिक त्रस्त आहे. यंदा मुंबईत उष्णतेचा कहर पाहिला मिळतोय. मुंबईत मध्येच उष्णता मध्येच आभाळ असे दुहेरी परिस्थिती दिसून येत आहे. त्यात भारतीय हवामान विभागाने मुंबईकरांसाठी संकटाची घंटा दिली आहे. मुंबईकरांसाठी पुढील पाच दिवस कठीण असणार आहे. मे महिन्याची सुरुवात झाली असून आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे 5 मे पर्यंत सूर्य आग ओकणार असल्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. उन्हाळ्याची सुट्टी आणि आज महाराष्ट्र दिनाची सुट्टी असून मुंबईतील पर्यटनस्थळी शुकशुकाट पाहिला मिळत आहे.
पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार मुंबईत पुढील पाच दिवस तापमान हे अंदाजाचे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सकाळी आभाळ असलं तरी दुपारी उष्णता वाढणार आहे. या उष्णतेची लाट आणि हवामान विभागाच्या इशारानंतर मुंबई पालिकेने नागरिकांना दुपाच्या वेळेत बाहेर पडणाऱ्या काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. तसंच मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना (एसओपी) प्रसिद्ध केलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे काय काळजी घ्यायची याबद्दल सांगितलं आहे.
विशेषत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी मे महिन्यात अधिक काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. एवढंच नाही तरी, मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात किंवा उन्हात एकटे सोडू नये, असंही सांगण्यात आलंय. यासोबतच दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे विशेष काळजी घेण्याबद्दल आवाहन करण्यात आलंय.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!
1मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. लोकल प्रवासांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. एकूण 15 डब्ब्यांच्या एसी लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाल्या आहेत. प्रवाशांकडून एसी लोकलला चांगला प्रतिसाद पाहता, हा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीये.
मोठी बातमी! लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाची सुट्टी, शनिवार आणि रविवार सलग तीन दिवस लॉंग विकेंड आल्यामुळे मुंबईकर घराबाहेर पडले आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण वाहतूक कोंडी पाहिला मिळत आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच पाहिला मिळालं आहे. अखेर वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांना 15 मिनिटांचा ब्लॉक घेण्याची वेळ आली आहे.
