जबलपूर येथे घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेने किमान नऊ जणांचा मृत्यू

जबलपूर येथे घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेने किमान नऊ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण अद्यापही बेपत्ता आहेत. बचाव पथकाने एक महिला आणि तिच्या चार वर्षांच्या मुलाचं शव पाण्याबाहेर काढलं,ते दृश्य पाहून सगळेच गहिवरले. कारण मायलेक अखेरचे एकमेकांच्या मिठीत बिलगलेल्या अवस्थेत आढळले. ही घटना घडल्यानंतर मयत महिलेच्या वहिनीने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

दिल्लीकर मायलेकाचा करुण अंत

३९ वर्षीय मरिना मस्सी आणि तिचा मुलगा त्रिशान यांचे शव एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत आढळून आले. आपल्या मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात, मरिनाने त्याला आपल्या ‘लाईफ जॅकेट’मध्ये घट्ट धरून ठेवले होते. या दोघांनाही कदाचित एखाद्या अरुंद जागेत अडकून पडावे लागले असावे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मरिनाचे पती प्रदीप आणि मुलगी सिया हे मात्र सुखरुप बचावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *