नवी मुंबईतून कोल्हापूर विमानतळावर आलेल्या विमानाने रविवारी रात्री हार्ड लँडिंग झालं. या विमानात असलेल्या 63 प्रवाशांनी मृत्यूचा थरार अनुभवला. कोल्हापूर विमानतळावर विमान लँडिंग करत असताना धावपट्टीवर चाकांचे घर्षण झाल्यामुळे जोरात आवाज आला अन् विमान उतरता उतरता परत हवेत उडालं. या घटनेमुळे विमानातील प्रवाशींमध्ये प्रचंड भीतीदायक वातावरण होतं. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
कोल्हापूर विमानतळावर नेमकं काय झालं?
कोल्हापूर विमानतळावर रविवारी रात्री सुमारास 8:35 वाजता विमानाचा मोठा अपघात होता होता टळला. ही घटना नवी मुंबई विमान कोल्हापूर विमानतळावर उतरत असताना घडली आहे. या विमानात मिळालेल्या माहितीनुसार 64 प्रवाशी होते. जेव्हा विमान कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना त्याचे चाक जोरात आदळल्यामुळे मोठा आवाज झाला आणि विमान हादरलं. यामुळे विमानातील प्रवाशी घाबरले. विमानाच्या या ‘हार्ड लँडिंग’मुळे मोठा हादरा बसल्यामुळे काही वेळासाठी वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार वैमानिकाच्या प्रसंगवधामुळे मोठा अपघात टळला. विमान धावपट्टीकडे वेगाने येत असताना हळूहळू विमानाच्या चाकांचा जमिनीला जोराचा स्पर्श झाला आणि विमानाे हार्ड लँडिंग केलं. हे लक्षात घेऊन वैमानिकांनी तात्काळ गो अराऊंडचा निर्णय घेतला आणि पुढच्या क्षणात लँडिंग होत असलेल्या विमानाने पुन्हा आकाशात झेप घेतली. आरएमपी प्रणालीचा वापर करुन या विमानाने कोल्हापूर शहरावर एक घिरटी घातल्यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा लँडिंग केलं जे, सुरक्षित करण्यात आलं.
