दुर्दैवी! लग्नाचं वऱ्हाड परतताना भीषण अपघात, 3 चिमुकल्यांचा बाप गेला, दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला

कोकणातही अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे असाच एक दुर्दैवी अपघात देवरुख पांगरी येथे झाला आहे देवरुख येथून लग्नकार्य आटपून घरी परतत असताना दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांवर काळाने घाला घातला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रत्नागिरी जवळील हातखंबा गावात शोककाळा पसरली आहे निष्ठूर नियतीने दोन कुटुंबांचे कमावते हातच असलेले आधार हिरावून नेले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की सुमित विलास कांबळे (वय 35) आणि विकास काशीराम कांबळे (वय 38, दोघेही हातखंबा) या दोन्ही तरुणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. या घटनेत तिसरा एक तरुण गंभीरित्या जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हातखंबा येथील राहणारा सुमित कांबळे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदयनिर्वाह चालवत होता. त्याच्या पश्चात सुमित याला तीन लहान मुली आहेत सुमितच्या जाण्याने कुटुंबाचा मोठा आधारच हरपला आहे. पत्नीला झालेल्या पती वियोगाबरोबरच तीन लहान मुलींचा बाप निष्ठुर नियती हिरावून घेतल्याने तीन मुली पोरक्या झाल्या आहेत.

दुसरा तरुण असलेला विकास काशीराम कांबळे याचाही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. विकास उत्तम वाहनचालक होता तो वाहन चालक म्हणून एका ठिकाणी खाजगी नोकरी करत होता. वाहन चालकाची नोकरी करून तो कुटुंबासाठी हातभार लावत होता त्याच्या पश्चात पत्नी दोन पुतळे भाऊ जय असा परिवार आहे या कुटुंबाचाही एक करता आधार हरपला आहे. विकास व सुमितच्या मृत्यूमुळे कांबळे कुटुंब शौकसागरात बुडाल आहे कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणार होता.

रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात देवरुख पांगरी येथील अवघड वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे हातखंबा आणि कांबळेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हातखंबा येथील तीन तरुण देवरुख येथील विवाह सोहळ्यासाठी गेले होते. हा विवाह सोहळा आटपून ते घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच नाणीज येथील नरेंद्रचार्य महाराज यांच्या संस्थांची रुग्णवाहिका तसेच स्थानिक नागरिक पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं. या घटनेतील गंभीरित्या जखमी युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच्यावर कोल्हापूर येथील सीपीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *