भारतातील तिसऱ्या नंबरच्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत खळबळ! 3,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले

Axis Bank Layoffs: IT सेक्टरला AI मोठा फटका बसला. हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यानंतर आता बँकिंग सेक्टरला देखील AI चा फटका बसत आहे.  AI मुळे  भारतातील तिसऱ्या नंबरच्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत खळबळ माजली आहे. या बँकेत AI चा वापर केला जाणार आहे. यामुळे एकाचवेळी 3,000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. जाणून घेऊया ही बँक कोणती आहे.

अॅक्सिस (Axis) बँकेत ही मोठी कर्मचारी कपात होणार आहे.  आर्थिक वर्ष 2025-26 च्या अखेरपर्यंत कर्मचारी कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. Axis बँकेत 3,000 लोकांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये बँकेत 1,04,000 कर्मचारी कार्यरत आहेत. आर्थिक वर्ष 2026 मध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे 1,01,000 पर्यंत कमी झाली आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ चौधरी यांनी शनिवारी एका ‘अर्निंग्ज कॉल’ दरम्यान ही माहिती दिली.  एकूण आकडेवारी पाहता बँकेने 3 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढले आहे.

कर्मचाऱ्यांच्या संख्येत ही कपात कोणत्याही विशिष्ट व्यवसाय विभागाला लक्ष्य करून करण्यात आलेली नाही, तर सर्व विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली असल्याचे Axis बँकेने स्पष्ट केले.  बँकेच्या सीएमडींनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्षमता वाढवण्यासाठी बँकेने मोठ्या प्रमाणात AI तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. यामुळे उत्पादकता सुधारली आहे. AI च्या वापरामुळे कर्मचारी कपात करण्यात आलेली नाही तर आर्थित बचत करण्यासाठी नवीन कर्मचारी थांबवण्यात आली आहे,

ॲक्सिस बँकेने गेल्या तीन ते चार वर्षांपासून आपल्या परिचालन खर्चाच्या 9 ते 10 टक्के रक्कम तंत्रज्ञानावर सातत्याने खर्च केली आहे.  व्यावसायिक चक्रांचा विचार न करता, दीर्घकालीन धोरणात्मक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने बँकेने ही गुंतवणूक केली आहे.

बँकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात झाली असली असली तरी बँकेने मोठा नफा कमवला आहे.  या वर्षी, बँकेने देशभरात जवळपास 400 नवीन शाखा उघडल्या आहेत. डिजिटायझेशन उपक्रम तसेच अतिरिक्त भरती आणि प्रशिक्षणाची आवश्यकता होती. बँकेने शाखा विस्तार आणि तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला.
ॲक्सिस बँकेची मार्च तिमाहीतील कामगिरी अंशी स्थिर होती. बँकेने 7,071 कोटींचा नफा कमावला. गेल्या वर्षी याच कालावधीतील बँकेला 7,117  कोटींचा नफा झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *