तुमच्या धर्मात मुली बुरखा घालत नाहीत म्हणून रेप…’, धक्कादायक जबाब; पाडव्याला साडी ओढली, संभाजी महाराजांबद्दल…

नाशिकच्या मल्टिनॅशनल कंपनीतील महिलांच्या अत्याचारासंदर्भात सुरु असलेल्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती आता समोर आल्याची पाहायला मिळत आहे. कॉर्पोरेट कंपनीत महिलांच्या छळाचे प्रकरण अधिक गंभीर आणि संतापजनक स्तरावर पोहोचल्याचं या प्रकरणावरुन अधोरेखित होत आहे. तरुणींचे केवळ लैंगिक शोषण किंवा विनयभंगच होत नव्हता, तर धार्मिक कट्टरता आणि वैयक्तिक आयुष्यावर घाणेरडी शेरेबाजी करत विवाहित तरुणीचा ‘जिहाद’च्या नावाखाली छळ कसा केला जायचा याची माहिती पीडितेनेच दिली आहे.

खासगी प्रश्न विचारून तो…

कंपनीत पहिल्या तीन महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत, ज्याचा प्रशिक्षणाशी संबंध नव्हता अशा कर्ज विभागाचा टीम लीडर रझा मेमन वारंवार ट्रेनिंगला यायचा. ‘तुझा नवरा बाहेर असतो, तू कसं मॅनेज करतेस? तुला भीती नाही वाटत का?’ अशा प्रश्नांच्या जाळ्यात तो माझे खासगी आयुष्य कुरतडू लागला. इतकेच नाही तर, ‘हनिमूनला कुठे गेले होते?’ असे खासगी प्रश्न विचारून तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता, असं पीडितेने सांगितलं आहे.

अश्लील हावभाव करत

ऑफिसमध्ये नवीन तरुणींना संशयित ‘प्लेअर’ म्हणून हिणवलं जायचं. तौसिफ अत्तार हा प्रशिक्षणाच्या नावाखाली अश्लील हावभाव करत नव्याने जॉइन झालेल्या तरुणींचे विनयभंग करायचा. लॉबीमध्ये थांबलेल्या मुलींच्या साडीवर, शरीरावर भाष्य करून क्रूर हास्य करत हे शिकारी कुत्र्यासारखे मुलींच्या डेस्कभोवती फिरायचे, असं पीडितेने म्हटलं आहे.

तुझी झिरो फिगर…

“मी जून 2025 ते मार्च 2026 या नऊ महिन्यांत नरकयातना सहन केल्या. धर्माचा आणि चारित्र्याचा अपमान आता सहन होत नव्हता. ऑफिसमधील असिफ अन्सारी दुसऱ्या टीममध्ये असूनही तो पाठलाग करायचा. ‘तुझी झिरो फिगर आहे. मी तुझ्या नवऱ्यापेक्षा चांगला आहे’, असे बोलून तो बाहेर भेटण्यासाठी दबाव टाकायचा. त्याला विरोध केला असता त्याने, ‘तुमच्या धर्मात मुली बुरखा घालत नाहीत म्हणून रेप होतात,’ असे बोलून त्याने धर्माचा अपमान केला,” असं पीडितेने सांगितलं आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी साडी खेचली

गुढीपाडव्याच्या दिवशी साडी नेसून आलेल्या एका पीडितेची आरोपींनी पेंट्रीजवळ साडी खेचली आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे. “तू क्या झिरो फिगर हो क्या?” म्हणत शरीराला स्पर्श करण्यात आल्याचंही पीडितेनं म्हटलं आहे.

धार्मिक अपमान

हिंदू देवी-देवता आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने आरोपींकडून केली जात होती. तसेच धर्मांतराचा दबाव पीडितांवर टाकला जात होता. “आमच्या धर्मात ये, तुझे वडील बरे होतील” असे सांगून धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जायचे असं पीडितेने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *