2030 पर्यंत काहीच टेन्शन नसताना आमदारकीचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश केला; काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना 119 दिवसात मोठी लॉटरी लागली

  काँग्रेस पक्षातून भाजप पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांना 119 दिवसात मोठी लॉटरी लागली आहे.   2030 पर्यंत काहीच टेन्शन नसताना प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजप पक्षात प्रवेश केला.  मात्र, आता त्या पुन्हा आमदार होणार आहेत.

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला  आहे. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रज्ञा सातव यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी विधान परिषदेतील आमदारकीचा आणि काँग्रेस मधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यांनतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढच्या राजकीय प्रवासाचे नियोजन करुनच त्यांनी विधान परिषदेतील आमदारकीचा आणि काँग्रेस मधील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिलेल्या आमदारकीची टर्म 27 जुलै 2030 पर्यंत होता. 2030 पर्यंत काहीच टेन्शन नसताना प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रवेशानंतर त्यांची जागा रिक्त झाली. विधान परिषदेतील त्यांच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.  या रिक्त असलेल्या परिषदेच्या जागेसाठी 12 मे रोजी पोटनिवडणुक होणार आहे. संख्याबळ पाहता ही जागा भाजपला मिळाली. या जागेवर भाजपने प्रज्ञा सातव यांनाच उमेदवारी दिली आहे. यामुळे प्रज्ञा सातव आता त्या भाजपच्या आमदार म्हणून  विधान परिषदेत जाणार आहेत.

प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचं संख्याबळ आठवरुन सातवर आलं

प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसला. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात आला. कारण सातव यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचं संख्याबळ आठवरुन सातवर आले. विधानपरिषेदत विरोधी पक्षनेतेपदासाठी 8 आमदारांची अट आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण आहेत प्रज्ञा सातव?

प्रज्ञा सातव या दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जायचे. 2021 मध्ये राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली.  2024 मध्ये काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून पाठवण्यात आले.  2021 पासून प्रज्ञा सातव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा होत्या.

विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे.  संख्याबळानुसार महायुती 8, मविआला 1 जागा मिळणार आहे. महायुतीने अतिरिक्त उमेदवार दिल्यास निवडणूक विनविरोध होणे अशक्य आहे.

विधान परिषदेचे कोणते आमदार निवृत्त होणार? 

उद्धव ठाकरे, शिवसेना UBT
नीलम गो-हे, शिवसेना
अमोल मिटकरी, राष्ट्रवादी
शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी SP
दादाराव केचे, भाजप
रणजितसिंह मोहिते, भाजप
संदीप जोशी, भाजप
राजेश राठोड, काँग्रेस
संजय केणेकर, भाजप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *