दहावीच्या परीक्षेसाठी वर्षभर अभ्यास केल्यानंतर अतिशय महत्त्वाच्या अशा या परीक्षा झाल्या. ज्यानंतर आता अनेक विद्यार्थ्यांनना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे निकालाची. याचदरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या वतीनं लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

प्राथमिक माहितीनुसार सीबीएसईकडून निकाल जाहीर करण्यासाठीची जोरदार तयारी सुरू असून मागील काही दिवसांतील प्रगती पाहता निकाल येत्या काळात जारी केला जाऊ शकतो असा अंदाज आहे. सीबीएसईच्या इयत्ता दहावीचा निकाल 14 एप्रिलला जारी केला जाणार की 15 एप्रिलला याबाबत मात्र स्पष्टोक्ती नाही. किंबहुना केंद्रीय शिक्षण मंडळानं तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही.

कधी जाहीर होणार निकाल?

केंद्रीय शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीचे निकाल 14 ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत जाहीर केले जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. ज्यामुळं आता तारखेच्या अधिकृत घोषणेकडेच विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान निकालाची तारीख जाहीर होताच विद्यार्थ्यांनी परीक्षा क्रमांक सोबत बाळगावा ज्याच्या मदतीनं त्यांना निकाल आणि गुणपत्रिका पाहता येईल.

कसा तपासावा निकाल?

  • निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.
  • www.cbse.gov.in या संकेतस्थळावरील रिझल्ट सेक्शनमध्ये हा निकाल असेल.
  • लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये निकालासाठीची लिंक दिसेल ज्यावर विद्यार्थ्यांनी क्लिक करणं अपेक्षित असेल.
  • इथं विद्यार्थी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि तर माहिती भरून लॉगईन करू शकतात.
  • सर्व माहितीची पूर्तता केल्यानंतरच स्क्रीनवर इयत्ता दहावीचा निकाल दिसेल.
  • निकालाशिवाय विद्यार्थ्यांना इथं त्यांची मार्कशीटसुद्धा दिसू शकेल.

दरम्यान, यंदाच्या वर्षी 17 फेब्रुवारी ते 11 मार्चदरम्यान जे विद्यार्थी दहावीच्या पहिल्या बोर्ड परीक्षेच्या निकालाशी सहमत नसतील त्यांना दुसरी बोर्ड परीक्षा देता येईल असंही सांगण्यात येत आहे. सीबीएसईमागोमागच एसएससी आणि आयीएसई शिक्षण मंडळांच्या परीक्षांच्या निकालांकडेसुद्धा विद्यार्थी वर्गाचं लक्ष असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *