खळबळजनक! सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका; तक्रार दाखल, चौकशी होणार

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर या खरातच्या निकटवर्तीय होत्या. त्यामुळे त्यांना आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्याकडून पक्षाचं महिला अध्यक्षपदाही काढून घेण्यात आलं. विशेष म्हणजे चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी सुनेत्र पवार आग्रही होत्या. पक्षातील काही बड्या नेत्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न चाकणकरांनी केला. मात्र सुनेत्रा या राजीनामा घेण्यावर ठाम होत्या आणि त्यामुळेच चाकणकरांना खुर्ची सोडावी लागली अशा बातम्या चाकणकरांच्या राजीनाम्याच्या दरम्यान पुढे आहे. आता पुन्हा एकदा चाकणकर यांच्यापासून सुनेत्र पवारांना धोका असल्याची तक्रार करण्यात आल्याने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चर्चेत आल्या आहेत.

शिर्डीत भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीचा वेग वाढला असून आता या प्रकरणाची झळ रुपाली चाकणकरांच्या घरापर्यंत पोहोचल्याचंही दिसत आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकरांना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अशोक खरात विरोधात शिर्डीत सावकारी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात समता पतसंस्थेतील खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या चौकशीत आता प्रतिभा चाकणकर यांचे नाव समोर आले असून त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या नावे समता पतसंस्थेत एकूण चार खाती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.या चार खात्यांवर तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे या व्यवहारांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चाकणकर यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर येत आहे.

अजून धक्कादायक खुलासे?

शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्त्यांवर नोटीस पाठवली असून पुढील पाच दिवसांत त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहून आपला जबाब नोंदवावा लागणार आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे चाकणकर कुटुंबावर लक्ष केंद्रीत झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नावही चर्चेत येऊ लागलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता केवळ गुन्हेगारीच नव्हे तर राजकीय छटा देखील लाभू लागल्याचं चित्र आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *