देशातील अनेक राज्यांतून एलईडी मासेमारी होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी देखील अशा मासेमारांवर कारवाई करण्याचे निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्रात अशाप्रकारच्या मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, इतर राज्यातील मासेमार महाराष्ट्रातील समुद्री भागात येऊन अनधिकृतपणे एलईडी मासेमारी करत आहेत, अशा बोटींवर देखील कारवाई होईल असा इशारा मच्छिमार संघटनांना सरकारकडून देण्यात आला आहे. तसेच सरकारने याबाबत कायदा काढला असूनही वारंवार हा प्रकार घडत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक मासेमार याविरोधात आंदोलेन करत आहेत. आता ते अधिक आक्रमक झाले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मच्छिमार बांधवांनी अनधिकृ एलईडी मासेमारी विरोधात आज मोर्चा काढला आहे. पण ही एलईडी मासेमारी नेमकी आहे तरी काय? आणि त्याचा पर्यावरणावर कसा परिणाम होत आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊया.
LED मासेमारी म्हणजे काय?
एलईडी मासेमारी ही समुद्रातील एक आधुनिक पण अत्यंत हानीकारक आणि विध्वंसकारी मासेमारी पद्धत आहे. अशाप्रकारची मासेमारी रात्री केली जाते. रात्रीच्या वेळी मासेमार बोटींवर प्रखर एलईडी लाईटचे बल्ब लावतात. या बल्बच्या प्रखर प्रकाशाकडे समुद्रातील मासे आणि इतर जलचर प्राणी आकर्षित होतात आणि मोठ्या प्रमाणात बोटीजवळ येऊन थांबतात. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यासाठी ही एक संधी मासेमारांना मिळते. यानंतर मासेमार आकर्षित झालेल्या माशांवर पर्ससीन नेट किंवा इतर जाळ्यांनी एका वेळी हजारो मासे पकडले जातात.
मासेमारीची ही पद्धत कशी काम करते?
मासेमार त्यांच्या बोटींवर शेकडो वॅटचे एलईडी बल्ब किंवा लाइट्स लावले जातात. अनेकदा समुद्रात 75 ते 100 किलोमीटर खोल पाण्यात देखील या लाइट्स लावल्या जातात. यातून येणार्या प्रकाशामुळे मासे हायप्नोटाईज्ड होऊन लाइटजवळ येतात आणि जाळ्यात अडकतात. या पद्धतीच्या मासेमारीत पारंपारिक मासेमारीपेक्षा जवळजवळ 10 ते 20 पट अधिक मासे मिळतात. या लाइट्स म्हणजे माशांसाठीचा हनी ट्रॅप आहे असे म्हणण्यास हरकत नाही. सरकारने मासेमारीच्या या पद्धतीला पूर्णपणे अनधिकृत घोषित करण्यात आले आहे.
LED मासेमारी अनधिकृत का मानली जाते?
अनेकांना प्रश्न पडला असेल की, ही मासेमारी मासेमारांच्या दिवसभराच्या मेहनतीला सोपा पर्याय ठरत आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा मिळत असेल. मग यावर बंदी का घातली गेली? कारण, मासेमारीची ही एक सोपी पद्धत असली तरी एक समुद्रासाठी ती विनाशकारी ठरू शकते. या पद्धतीने मासेमारी केल्यास मोठे मासे, लहान मासे, अंडी-बीज सर्व काही जाळ्यात सापडते. यामुळे समुद्रातील मासळीचा साठा वेगाने संपून तो संपुष्टात येऊ शकतो. यामुळे कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई किनाऱ्यावरील पारंपारिक मासेमार दिवसा किंवा सामान्य पद्धतीने मासेमारी करू शकत नाहीत. कारण एलईडी मासेमारी करणाऱ्या मासेमारांनी रात्रीच अधिक प्रमाणात मासे पकडलेले असतात. तसेच यामुळे मोठ्याप्रमाणात पार्यावरणीय नुकसान होऊ शकते.
बेकायेशीर एलईडी बोटींवर मत्स विभागाची सर्जिकल स्ट्राईक
दरम्यान, केंद्र सरकारने 10 नोव्हेंबर 2017 पासून एलईडी मासेमारीवर पूर्ण बंदी घातली आहे, तरीही महाराष्ट्रात विशेषतः कोकण समुद्रकिनाऱ्यावर परप्रांतीय बोटी अशाप्रकारची बेकायदेशीर मासेमारी करताना आढळले. ज्यांना मत्स्य विभाग, कोस्टल सिक्युरिटी आणि पोलिसांकडून वेळोवेळी सर्जिकल स्ट्राईक करून त्यांच्या बोटी, जाळे, जनरेटर आणि एलईडी लाइट्स जप्त करण्यात आल्या आहेत. नुकत्याच रत्नागिरी आणि मुंबई किनाऱ्यावर अशा अनेक बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सरकारकडून यावर अधिक तीव्र कारवाई करता येईल याची योजना आखली जाते आहे.
