नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलीये. SITकडे सादर करण्यात आलेल्या फॉरेन्सिक अहवालानुसार तब्बल 160 जीबीच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे काळे कारनामे उघड झालेत. लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि इतर स्टोरेज डिव्हाइस जप्त करून तपास करण्यात आलाय. A, B, C अशा कोडनेमद्वारे या पुराव्यांचं वर्गीकरण करण्यात आलंय. यात लैंगिक अत्याचारांचे गंभीर पुरावे आढळल्याची माहितीही समोर आलीये. तपासात अनेक महिलांची नावं आणि भेटींच्या नोंदीही सापडल्यात. पोलिसांनी हे सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्याची प्रक्रिया सुरू केलीये. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर
भोंदू बाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. शेतकऱ्यांच्या नावावर अॅग्रो कंपन्या उभा करायच्या आणि त्यातून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार करून पैसा काळ्याचा पांढरा करायचा, असा फंडा भोंदू अशोक खरातने सुरू केला होता. ‘मला संचालक करा, भराभराट होईल’ असे भविष्य सांगत हा भोंदू खरात काळापैसा रिचवत होता. ४ वर्षांत अशा ६ कंपन्या अशोक खरात व पत्नी कल्पनाने उभ्या करून माया जमवली. ७० कोटींच्या खरेदीवर ७० कोटींचीच विक्री दाखवून या कंपनीने गणिताचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचंही समोर आलंय.
भोंदू खरातच्या खात्यात एकाच दिवशी 4 कोटी रुपये आल्याची माहितीसमोर आली आहे. खरातला एकाच दिवशी 4 कोटी रुपये कुणी दिले? याचा शोध सुरू आहे. शेतकऱ्याला व्याजाने पैसे देण्यासाठी भोंदू खरातच्या खात्यात आले पैसे असं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भोंदु अशोक खरात पुन्हा जुन्या गुन्ह्यात आरोपी होण्याची शक्यता आहे. कारण शिर्डीतल्या 2022 मधल्या गाजलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात आता मोठं वळण आलंय. साईसंस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांनी आत्महत्या केली होती. आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये भोंदू अशोक खरातवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता.. मात्र नंतर चार्जशिटमधून त्याचं नाव वगळण्यात आलं होतं. आता या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी राहता कोर्टाकडून मान्य करण्यात आलीय. त्यामुळे शिर्डी पोलीस आता 2022मधील गुन्ह्याचा नव्याने तपास सुरू करणार आहेत.. या सगळ्यात भोंदू खरातचा नेमका सहभाग होता का. हे तपासातून स्पष्ट होणार असून, पुन्हा एकदा त्याच्यावर आरोपी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
आयकर विभाग-ईडीची संयुक्त बैठक- सूत्र
दरम्यान भोंदू अशोक खरात प्रकरणात आयकर विभाग-ईडीची संयुक्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खरातच्या मालमत्तांवर छापेसंदर्भात ठाणे शहरातील कार्यालयात बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने दोन दिवसांपूर्वीच भोंदू अशोक खरात संबंधित असलेल्या जमीन खरेदी विक्रीचे मूळ दस्तावेज आणि बँक अकाउंट चा तपशील ताब्यात घेतला होता.
अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणा-या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ झालीये. नाशिक सत्र न्यायालयाने तिस-या गुन्ह्यात खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये. नाशिक येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात हाय-प्रोफाईल सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने खरातच्या कृत्यांचा पाढा वाचला. तसेच त्याच्या विरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर पुरावे सादर केले.
रुपाली चाकणकरांच्या बहिणीलाही नोटीस-सूत्र
दरम्यान रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलीस बजावणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..समता पतसंस्थेतील खात्यांसदर्भात पोलिस प्रतिभा चाकरणकरांची चौकशी करण्याची शक्यता आहे. समता पतंसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांच्यासह परिवारातील सदस्यांच्या नावे चार खाते असल्याचं समोर आलंय. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर त्यांच्या मुलांच्या नावे दोन खाती आहेत..या चार खात्यांवर 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे..समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरात नॉमीनी असलेले 100 खाते तर सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेत खरात नॉमीनी असेलेले 32 खाते आहेत.
